शेतकऱ्याच्या खिश्यातून २५ हजारांची रोकड लांबविली

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील युनियन बँकजवळून पायी जात असतांना एका शेतकऱ्यांच्या खिश्यातून २५ हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी २ जुलै रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवार ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केशवराव भिका पाटील वय-६६ रा. रामकृष्ण नगर, धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार २ जुलै रोजी दुपारी २ वाजता ते धरणगाव शहरातील युनियन बँकेजवळून पायी जात असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिश्यातील २५ हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. दरम्यान पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवार ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील हे करीत आहे.

Protected Content