कार-ट्रकच्या अपघातात गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या चार भाविकांचा मृत्यू

नांदेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंजाब येथून नांदेड येथे गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. कार आणि ट्रकचा अपघात होऊन चार जण जागीच ठार झाले आहे. तर काही जण जखमी झाले आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला. अपघात मृत्यूमुखी पडलेल्यांची व जखमींची नावे समजू शकली नाही.

पंजाब येथून काही जण नांदेड येथे गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी जात होते. त्यांची गाडी यवतमाळ नागपूर महामार्गावर आली असता येथील चापरडा गावाजवळ एका ट्रकला त्यांची कार ही पाठीमागून जोरदार धडकली. ही धडक ऐवढी भीषण होती की जागेवरच गाडीतील चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेत कारचा चक्काचूर झाला आहे. या घटनेची माहितीमिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य राबवले. त्यांनी जखमी नागरिकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे.

पंजाब येथील एक शीख कुटुंब दर्शनासाठी नांदेडला जात असताना वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे समजू शकली नाही. हे सर्व जण इनोव्हा कारने नांदेडला जात होते. यावेळी त्यांची गाडी चारपडा गावाजवळ ट्रकला मागून धडकली. हा अपघात कसा झाला या बाबत माहिती मिळू शकली नाही. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हा अपघात झाला तेव्हा घटनास्थळी विदारक चित्र होते. अपघातस्थळी चौकात रक्ताचा सडा पडला होता. तर गाडीचा चक्काचूर झाला होता. अपघात झाल्यावर या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून येथील वाहतूक सुरळलीत केली.

Protected Content