विवाहीत तरूणाने पोटाच्या आजारास कंटाळून घेतला टोकाचा निर्णय !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील साकळी गावात राहणाऱ्या एका विवाहीत तरूणाची पोटाच्या आजारास कंटाळुन आपल्या राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. पोलीसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की मुकेश माधव गजरे वय४० वर्ष राहणार साकळी तालुका यावल या विवाहित तरूणाने पोटाच्या आजारास कंटाळुन १ जुलै २०२४ सोमवार रोजी मध्यरात्री सुमारास आपल्या राहत्या घरातील छताच्या एंगलला साडीच्या सहायाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. यावल पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ राकेश माधव गजरे यांनी दिलेल्या खबरी वरून अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सिकंदर तडवी हे करीत आहे. मरण पावलेल्या तरूणाच्या मृतदेहावर यावलच्या ग्रामीण रूग्णालयात डॉ. तुषार सोनवणे यांनी केले .

Protected Content