भरधाव आयशरची ट्रॅक्टरला धडक; एक गंभीर जखमी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर ते जामनेर रस्त्यावरील हॉटेल रोहिणीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रक्टर चालक हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात आयशवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नारायण अंबादास धोंगडे वय ५९ रा. सावजी नगर, मलकापूर हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. भारत बेंच कंपनीचे ट्रक्टर इच्छीत स्थळी पोहचविण्याचे काम करता. शनिवारी २९ जून रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास नारायण धोंगडे हे ट्रॅक्टर क्रमांक एमएच २८ बीबी ८३३ हे घेवून जामनेर ते पहूर मार्गे जात असतांना हॉटेल रोहिणीसमोर भरधाव वेगाने येणारे आयशर ट्रकने त्यांच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टर चालक जखमी झाला तर वाहनाचे मोठे नुकसान केले आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता पहूर पोलीस ठाण्यात आयशर वरील ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप चौधरी हे करीत आहे.

Protected Content