मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते बनले आहे. ‘जोडो भारत यात्रे’दरम्यान राहुल गांधींनी देशभरात दौरा केला आणि जनतेच्या मनात घर केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी महाराष्ट्रातही अनेक सभा घेतला. आता तर राहुल गांधी पंढरीच्या वारीत सामील होणार असल्याची माहिती आहे.
पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात राहणाऱ्या पांडुरंगाचा उत्सव आहे. महाराष्ट्रातील या वारीने देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकांना अचंबित केले आहे. अशा या वारीत सामील होण्यापासून राहुल गांधीही स्वत: रोखू शकणार नसल्याचे दिसत आहे. यंदा पंढरीच्या वारीत राहुल गांधी एक दिवस वारी अनुभवणार आहेत.
पायी वारी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज सोहळ्यात राहुल गांधी वारकरी भक्तांसोबत पायी चालणार आहेत. शरद पवार यांच्या ‘वारी अनुभवा’ ह्या घोषित कार्यक्रमा नंतर राहुल गांधी देखीदेखील पंढरीच्या वारीत सहभागी होणार आहेत. वारकरी भक्तांसोबत पायी सोहळ्यानंतर पंढरपुरात येऊन राहुल गांधी विठ्ठलाचं दर्शनही घेतील. दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठीकडून पंढरपूर येथील शिरस्थ पदाधिकारी यांच्याकडे वारी बाबत माहिती घेतली जात आहे.