बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आतंरराष्ट्रीय योग दिन महावितरणच्या बुलडाणा येथील विद्युत भवन येथे योगाभ्यास करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी कर्मचारी,अभियंते व अधिकारी यांनी नियमित योगासने करून मानसिक आणि शारीरीकदृष्ट्या तंदरूस्त राहण्याचे आवाहन केले.
महावितरणसारख्या अत्यावशक सेवा क्षेत्रात काम करतांना ताण -तणाव येणे हे साहजिकच आहे.परंतू ताण तणावामुळे मानसिक आरोग्य बिघडते. याशिवाय काळाच्या ओघात प्रत्येकांची जीवन जगण्याची पध्दत बदलली असल्यामुळे शारीरीक व्याधीचा सामना करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.त्यामुळे मानसिक आणि शारीरीक दृष्टीने तंदरूस्त राहण्यासाठी योगाभ्यास एक उत्तम साधन आहे.त्यामुळे कर्मचारीच नाहीतर कुटूंबातील प्रत्येकांनी दररोज किमान एक तास स्वत:साठी काढून योगाभ्यास करावा असे यावेळी सुरेंद्र कटके यांनी सांगीतले.
यावेळी उपकार्यकारी अभियंता विनोद गुबे यांनी योग आणि योगाचे महत्व यावर मार्गदर्शन केले, तसेच वंदना उबरहांडे (उच्चस्तर लिपिक मासं ) यांनी आसने व प्राणायाम याबद्दल माहिती दिली. महावितरण बुलडाणा कार्यालयातील मानव संसाधन विभाग यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून योग दिवसाचे नियोजन केले होते. यावेळी कार्यकारी अभियंता बद्रिनाथ जायभाये,व्यवस्थापक वित्त व लेखा विकास बांबल,व्यवस्थापक मानव संसाधन मनिष कदम, उपकार्यकारी अभियंता विवेक वाघ यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.