बंद घर फोडून दीड लाखांच ऐवज लांबविली; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुनंदिनी पार्क येथे एकाचे बंद घर फोडून कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व ५० हजारांची रोकड असा एकुण १ लाख ४१ हजार रुपये किमतींचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी १६ जून रोजी पहाटे ४.३० वाजता उघडकीला आला आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दिनेश भगवान भालेराव वय -४४, रा. सुनंदिनी पार्क जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. प्रिंटिंग प्रेसचे काम करून ते आपल्या उदरनिर्वाह करतात. दरम्यान १४ जून रात्री ११ ते १६ जून पहाटे ४.३० वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद होते.याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटात ठेवलेले ५० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४१ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर दिनेश भालेराव यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीही माहिती मिळाली नाही. त्यांनी दुपारी ३ वाजता शनिपेठ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास रंगनाथ धारबळे हे करीत आहे.

Protected Content