जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता नववीच्या वर्गातील विद्यार्थिनी ओजल नीलेश सूर्यवंशी हिने गोवा- पणजी येथे आयोजित अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघातर्फे घेण्यात येणाऱ्या भारत नृत्य महोत्सव अंतर्गत गोवा- पणजी येथे आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
या स्पर्धेमध्ये भारतासह इतर देशांमधून १५५ नृत्य शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसोबत आले होते. ओजल हिस या भारत नृत्य महोत्सवाच्या बक्षीस वितरणाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ओजल हिला तिच्या कथ्थक गुरु अर्चना चौधरी यांनी मार्गदर्शन केले. ओजलच्या या यशाबद्दल स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांनी तिचा गुणगौरव केला. तसेच खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी तिचे अभिनंदन केले आहे.