Home ट्रेंडींग ऑस्ट्रेलियन पंतप्रधान म्हणाले, ‘कितना अच्छा है मोदी !’

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान म्हणाले, ‘कितना अच्छा है मोदी !’

0
87
modi morrison

modi morrison

ओसाका वृत्तसंस्था । जागतिक पातळीवर नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखीत झाली असून आता ऑस्ट्रेलीयन पंतप्रधानांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेऊन ‘कितना अच्छा है !’ मोदी या शब्दांमध्ये स्तुतीसुमने उधळली आहेत.

जापनमधील ओसाका शहरात जी-२० देशांची शिखर परिषद सुरू असून यात सदस्य राष्ट्रांचे प्रमुख सहभागी झालेले आहेत. यात आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करत त्यांच्यासोबत सेल्फी काढला. याबाबत स्कॉट मॉरिसन यांनी त्यांच्या ट्विटर हॅँडलवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिलं आहे की, ”कितना अच्छा है मोदी !” याचसोबत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत घेतलेला सेल्फी फोटो अपलोड केला आहे. या माध्यमातून मोदींच्या आंतराष्ट्रीय पातळीवरील लोकप्रियतेचे एक उदाहरण समोर आल्याचे मानले जात आहे.


Protected Content

Play sound