प्रगती, सिंहगड एक्स्प्रेस दोन दिवस रद्द

3Train 3 111

भुसावळ प्रतिनिधी । पुणे मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झालेला आहे. म्हणून पुढील दोन दिवसांसाठी गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

याबाबत माहिती अशी की, जसे यामध्ये प्रगती एक्‍स्प्रेस, सिंहगड एक्‍स्प्रेस आणि पुणे-पनवेल पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पुणे-भुसावळ एक्‍स्प्रेचा मार्ग बदलण्यात आला आहे. पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्‍स्प्रेस (12126,5), पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्‍स्प्रेस (11010,09) आणि पुणे-पनवेल-पुणे पॅसेंजर (51318,17) या गाड्या आज शनिवारी (दि.29 जून) आणि रविवारी (दि.30 जून) रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुणे-भुसावळ-पुणे एक्‍स्प्रेसचा (11025,26) मार्ग बदलण्यात आला असून, ती पुढील दोन दिवस दौंड-मनमाड मार्गाने धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

Protected Content