जळगाव-दत्तात्रय गुरव । एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या लोकांसाठी शासनाच्या वतीने एआरटी सेवेला वीस वर्षे पूर्ण झाली आहे. या अनुषंगाने जळगाव येथील कार्यालयात आज सेवा देणाऱ्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांसह रूग्णांचा सत्कार करण्यात आला.
जळगाव एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या लोकांसाठी शासनाच्या वतीने मोफत औषधोपचार मिळवून देण्यासाठी एआरटी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या सेवेला आज २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्था आणि जळगाव येथील विहान काळजी व आधार केंद्राच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील एआरटी केंद्र व जिल्हा एड्स नियंत्रण केंद्रात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह रूग्णांचा गौरव चिन्ह प्रमाणपत्र बुके देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा शैल्य चिकित्सक, आयसीटीसी विभागातील कर्मचारी एआरटी सेंटर मधील कर्मचारी आणि अधिकारी कर्मचारी आणि अधिकारी यांचा गौरव चिन्ह प्रमाणपत्र बुके देऊन गौरव करण्यात आला. यावेळी वीस वर्षापासून नियमित औषध उपचार घेत एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या रुग्णांचा देखील सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, जिल्हा एड्स नियंत्रक कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर, एआरटी सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपमा जावळे, डॉ. रेश्मा उपाध्ये, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील, रेणु प्रसाद, आयसीटीसी विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि समुपदेशक, यार टी सेंटर मधील समुपदेशक कर्मचारी, विहान काळजी व आधार केंद्र येथील कर्मचारी, एचआयव्ही सहज जीवन जगणारे संसर्गित स्त्री-पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.
आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉ.भारती पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, एचआयव्हीचा संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी एआरटी औषधाचा उपयोग होतो. परंतु ते नियमित घेणे गरजेचे असते. यासाठी एआरटी सेंटर व विहान काळजी सहाय्य केंद्रातील समुपदेशक नियमित रुग्णांना समुपदेशन सेवा देतात. तसेच वैद्यकीय अधिकारी त्यांना औषध उपचाराच्या सेवा उपलब्ध करून देत असतात. एचआयव्ही सहजीवन असलेल्या व्यक्तीने एआरटी औषध उपचार घेतला तर ते आपलं आयुष्य सामान्यपणे जगू शकतात यामुळे शंका असलेल्या सर्व व्यक्तींनी एचआयव्हीची तपासणी करून औषध उपचार नियमित घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.