यापुढे कोणतीही निवडणूक तीव्र उन्हाळयात होणार नाही – मुख्य निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | २०२४ च्या लोकसभा निवडणुका आपल्या नियोजित वेळेनुसार पण रणरणत्या उन्हात झाल्या. यावेळी संपूर्ण देशभर उन्हाचा चटका सर्वाधिक तीव्र होता. त्याचा फटका निवडणूक कर्मचाऱ्यांना बसला. काही निवडणूक कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले.

या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी संपूर्ण देशाला ग्वाही दिली, ती म्हणजे इथून पुढे रणरणत्या उन्हात कोणतीही निवडणूक घेतली जाणार नाही. निवडणुकीची प्रक्रिया उन्हाळ्याच्या महिन्यापूर्वी पूर्ण केली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.

Protected Content