१ जूनला होणार इंडिया आघाडीची बैठक

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशभरात लोकसभा निवडणुकीची गेले दीड महिने धामधूम पाहायला मिळाली. त्यात देशभरात एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी काटे की टक्कर पाहायला मिळाली. आता लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा राहिला आहे. त्यात १ जून रोजी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्वपूर्ण बैठक दिल्लीत बोलावण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. अशा परिस्थितीत निकालापूर्वीच इंडिया आघाडीची दिल्लीत 1 जूनला बैठक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. निवडणुकीनंतरची परिस्थिती लक्षात घेऊन होणाऱ्या बैठकीत आपापसांत एकजूट ठेवण्याचा प्रयत्न आणि पुढील तयारीची रणनीती या बैठकीत ठरणार आहे.

१ जून रोजी दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्व मित्रपक्षांना सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आले आहे. निवडणूक आणि निकालानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक होत असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या बैठकीला देशातील घटक पक्षाचे आणि राष्ट्रीय पक्षाचे कोणते महत्वाचे नेते उपस्थित राहतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. इंडिया आघाडीची बैठक अशा वेळी होत आहे जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. निवडणूक निकालापूर्वी विरोधी पक्षनेत्यांची ही बैठक घेतली जात आहे. आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाचा शेवटचा दिवस आहे, त्या दिवशी ही बैठक नियोजित करण्यात आली आहे.

Protected Content