जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील बांधावरून गावातील महिला पोलीस पाटील व इतरांनी त्यांना आणि त्यांच्या मुलाला विड्याने व लाकडी दांड्याने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान पोलीस प्रशासनकडे तक्रार करूनही त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. मागणीसाठी पाचोरा तालुक्यातील पहाण गावातील शेतकरी अण्णा सुखदेव महाजन यांनी आज शिवतीर्थ मैदान येथे संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील पहाण गावात अण्णा सुखदेव महाजन हे आपले परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांचे पाचोरा तालुक्यातील पहाण शिवारातील गट नंबर २६२ मध्ये त्यांचे शेत आहे. या शेताला लागूनच गावातील महिला पोलीस पाटील कल्पना पंडित महाजन यांचे देखील शेत आहे. दरम्यान महिला पोलीस पाटील आणि त्यांच्यासोबत असलेले पंडित बाबुराव महाजन, राजेंद्र लहू महाजन, शुभम राजेंद्र महाजन यांनी त्यांच्या शेतातच्या बाजूला असलेल्या बांधाला ट्रॅक्टरने कोरून अतिक्रमण केले आहे. या संदर्भात त्यांनी जाब विचारला असता शेतकरी अण्णा महाजन यांना लोखंडी विड्याने व लाकडे दंड्याने बेदम मारहाण करून जिवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान या संदर्भात गावातील सरपंच यांना देखील तक्रार दिली आहे. त्यांच्याकडून कुठलेही न्याय न मिळाल्याने अखेर त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यानंतर त्यांनी आज मंगळवारी २१ मे रोजी दुपारी १२ वाजता जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथील मोकळ्या जागेत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत संबंधित व्यक्ती यांच्यावर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा देखील पवित्रा घेतला आहे.