यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरातील शिवाजीनगर भागात किल्ला परिसरातून एकाच कुटुंबातील वृद्ध महिला व विधवा महिला तसेच सात वर्षीय बालक आणि चार वर्षीय बालिका अशी चौघे बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हे चौघे जण घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेले होते. परंतू मागील चार दिवसांपासून बेपत्ता झाले आहे. कुटूंबाच्या वतीने त्यांचा सर्वत्र शोध घेतले असता ते मिळून नसल्याने अखेर यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील चौघेजण बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
यावल शहरातील शिवाजी नगरात किल्ला परिसरात वस्ती आहे. या वस्तीतील रहिवाशी संगीता दिलीप सोनार (वय ४८) ही वृद्ध महिला आपली विधवा मुलगी मीनाक्षी उर्फ पूजा मुकेश सोनार (वय २६), गणेश मुकेश सोनार (वय ७) व पियू मुकेश सोनार (वय ४) हे चौघे जण मागच्या महिन्यात मेहुणे मुकेश अशोक सोनार यांचे किडनीच्या आजाराने दुदैवी निधन झाले असल्याने विधवा झालेली बहीण मिनाक्षी सोनार हे शिवाजीनगर येथील भाऊकडे रहात होते. मिनाक्षी सोनार व तिच्या दोन लहान बाळसह चार जण हे ९ मे रोजी आपल्या घरात कोणाला काही एक न सांगता बाहेर गेले आणि बेपत्ता झाले. कुटुंबातील व परिसरातील नागरीकांनी या चौघांचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला. मात्र, चौघे कुठेच मिळून न आल्याने अखेर यावल पोलीस ठाण्यात हरवलेल्या विधवा मिनाक्षी सोनार यांचा भाऊ गणेश दिलीप सोनार यांनी दिलेल्या खबरी वरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. दरम्यान शहरातुन विधवा महिलेसह एकाच कुटुंबातील चौघेजण बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या चौघांचा शोध आता यावल पोलीसांच्या माध्यमातुन शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.
यावल येथील एकाच कुटुंबातील वृद्ध महिला आणि विधवा महिला दोन चिमुकल्यासह चौघे बेपत्ता
7 months ago
No Comments