बाहेरपुरात एकाची गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील बाहेरपुरा भागातील एका हातमजुराने आर्थिक विवंचनेतून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील व्ही. पी. रोड, कामगार कल्याण केंद्राजवळील (बाहेरपुरा) रहिवाशी प्रकाश धना अंभोरे (वय – ४६) हे हातमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा गाळा हाकत होते. परिस्थिती हालाखीची, त्यातच हाताला काम नसल्याने आर्थिक विवंचनेतून प्रकाश अंभोरे यांनी दि. ४ जुन रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घराजवळील शाळेच्या छताला दोर आवळुन गळफास लावत आपली जीवन यात्रा संपवली. मयत प्रकाश अंभोरे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले.

या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत प्रकाश धना अंभोरे यांचे पाश्चात्य पत्नी, एक मुलगा, एक मुलगी (विवाहीत), एक भाऊ असा परिवार आहे. प्रकाश अंभोरे यांचे अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!