नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मालेगाव तालुक्यातील अजंग या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील अजंग या गावातून एक आठ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. ती दोन दिवसांपासून बेपत्ता होती. या मुलीचा मृतदेह अखेर मोसम नदीच्या काठावर असलेल्या विहीरीत आढळून आला. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच संतप्त झालेल्या ग्रामस्थ्यांनी नामपूर-मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.