नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभेचे सांसद सुशीलकुमार मोदी यांचे १३ मे रोजी संध्याकाळी दिल्ली येथील एम्समध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना काही काळापासून घशाचा कर्करोग झाला होता. ते ७२ वर्षांचे होते. राष्ट्रपती, पंतप्रधान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, आरजेडी अध्यक्ष लालू यादव यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
त्यांचे पार्थिव दिल्लीहून मंगळवारी दुपारी १२ वाजता विशेष विमानाने पटना येथे आणले जाणार आहे. पाटणा विमानतळावरून पार्थिव थेट घरी नेण्यात येणार आहे. राजेंद्र नगर येथील त्यांच्या खाजगी निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. भाजप कार्यालय, एमएलसी मार्गे पाटणा येथील गुलबी घाटावर पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सुशील मोदी यांच्या निधनाने बिहारसह दिल्लीत शोककळा पसरली आहे.



