मोहाडी रोडवरील दगडफेक प्रकरणी पोलीसात ९ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोहाडीरोड वरील गुरू पेट्रोलपंपाजवळील एम्पेरीयल अपार्टमेंट जवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादातून भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मोहाडी गावातील सरपंचाला शिवीगाळ करत मारहाण केली तसेच कारचे नुकसान केल्याची घटना शुक्रवारी १० मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ११ मे रोजी मध्यरात्री २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात शुक्रवारी ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता गावात राहणारे काशीनाथ गवळी यांच्यासोबत जुन्या भांडणाच्या कारणावरून दिपक हटकर, सागर हटकर, अंकूश हटकर हे दारू पिऊन शिवीगाळ करत मारहाण करत होते. त्यावेळी गावातील सरपंच धनंजय भिलाभाऊ सोनवणे वय ३३ रा. मोहाडी ता.जि.जळगाव हे भांडण सोडविण्यासाठी गेले. दरम्यान, सायंकाळी ७.३० वाजता मोहाडीरोडवरील गुरू पेट्रोलपंपाजवळील एम्पेरीयल अपार्टमेंट जवळ सरपंच धनंजय सोनवणे हे काही तरूणांशी बोलत होते. भांडण सोडविण्याचा राग मनात ठेवून संशयित राजू हटकर, अंकुश हटकर, गोलू हटकर, महेंद्र हटकर, सागर हटकर, दिपक हटकर, भरत हटकर, अर्जून हटकर, आकाश हटकर यांनी लाठ्या काठ्या घेवून धनंजय सोनवणे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्यांची कार क्रमांक (एमएच १९ सीझेड ०३७७) वर दगड टाकून तोडफोड करून नुकसान केले. तसेच घरांवर दगडफेक करून घरांच्या काचा देखील फोडण्यात आल्या. याप्रकरणी शनिवारी ११ मे रोजी मध्यरात्री २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजू हटकर, अंकुश हटकर, गोलू हटकर, महेंद्र हटकर, सागर हटकर, दिपक हटकर, भरत हटकर, अर्जून हटकर, आकाश हटकर सर्व रा. मोहाडी ता.जि.जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे करीत आहे.

Protected Content