जळगाव व रावेर मतदारसंघात निवडणूक साहित्यासह अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघ निहाय मतदान साहित्य , ईव्हीएम मशीन चे वाटप रविवार दि. १२ रोजी करण्यात आले. दुपार नंतर मतदान कर्मचारी ईव्हीएम मशीन व साहित्यासह मतदान केंद्रावर रवाना झाले.
१३ मे रोजी सकाळी ७ वाजेपासून जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील ३८८६ मतदान केंद्रावर रविवारी ३८८६ मतदान यंत्रे व व्ही व्ही पॅट मशीन सह वाहनांच्या सहाय्याने निवडणूक विभागाने निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर पोहचविण्यात आले . त्यासोबतच कोणत्याही तांत्रिक अडचणींचा सामना करण्यासाठी राखीव मतदान यंत्रे देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Protected Content