खड्डेयमय रस्त्यांसाठी राष्ट्रवादीची अनोखी गांधीगिरी !

जळगाव प्रतिनिधी । शहरातील काशिनाथ लॉज ते शेरा चौक दरम्यानच्या रस्त्याची दयनिय अवस्था झाल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांना गुलाबपुष्प भेट देऊन त्यांचा सत्कार करण्याचे आंदोलन आज बुधवार २ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हा वक्ता प्रशिक्षण शहर जिल्हाध्यक्ष साहिल पटेल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

काशिनाथ लॉज ते शेराचौक दरम्यानचा रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत खराब झाला असून नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केल्यावरही या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मनपाने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये यासाठी या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या सहनशीलता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांना गुलाबपुष्प भेट देऊन त्यांचा सत्कार करण्याचे आंदोलन केले.

यावेळी नागरिकांसह येथील दुकानदार आणि रहिवाशी यांनी हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आंदोलनकर्ते साहिल पटेल यांनी सांगितले कि, हा रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असून नागरिकांना पायी अथवा वाहनाद्वारे चालणेही कठीण झाले असून तसेच रस्त्याच्या धुळीचाही मोठ्याप्रमाणावर त्रास होत असून आज नागरिकांना गुलाबपुष्प देऊन सत्कार करून मनपा सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनात अकील पटेल, मुजाहिद खान, मो. शफी पिंजारी, किरण चौधरी, गणेश सोनगिरे, संदीप काबरा, आझाद टेलर, शेख रफिक शेख युसूफ, शरद बोरसे, दीपक गंगराळे, ताहेर पाटणवाला, मेहमूद शेख, गणेश निकम, मनोहर सपकाळे , कपिल महाजन, छोटू पटेल, काशिनाथ शिंदे, संजय अहिरे, विजय पाटील, मनोजकुमार, वसीम सैय्यद यांच्यासह असंख्य कार्यकर्ते नागिरकांचा सहभाग होता.

Protected Content