रेड स्वस्तिक व छत्रपती शिवाजी ब्रिगेडतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन

एरंडोल, प्रतिनिधी | पारोळा येथे रेड स्वस्तिक व छत्रपती शिवाजी ब्रिगेड यांच्या वतीने उत्तर महाराष्ट्र स्तरीय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन रविवार ३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. या मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त युवकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

कोरोनाच्या सावटाखाली मंदावलेल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये पून्हा उद्योग सुरु झाले असून उद्योगक्षेत्रातील विविध नामांकित कंपन्यामध्ये बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य क्षेत्रात कार्यरत रेड स्वस्तिक सोसायटी व युवकांसाठी कार्यरत सेवा भावी संस्था छत्रपती शिवाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री हरिनाथ मंगल कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती पारोळा  रविवार दि. ३ ऑक्टोबर रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आले आहे. या मेळाव्यात  नाशिक, पुणे (चाकण, तळेगाव , रांजणगाव आदी), मुंबई, ठाणे, सातारा,सांगली, कोल्हापूर, चिपळूण, रायगड, नागपूर इत्यादी एमआयडीसी  मधील नामांकित एमएनसी कंपन्यांमध्ये युवक युवतींना रोजगाराच्या संधी मिळणार आहे. यामध्ये १०वी, १२वी, आयटीआय  – सर्व ट्रेड, डिप्लोमा, डिग्री , बीए , बी कॉम  ,बीएस्सी  या शैक्षणिक अहर्ता प्राप्त युवक युवतींनी सहभाग घ्यावयाचा आहे. तसेच या पदांसाठी वयोमर्यादा वय वर्षे १८-३० अशी असणार आहे. गत अनेक वर्षांपासून या दोन्ही सेवाभावी संस्थांनी राज्यभर आरोग्य तसेच रोजगाराच्या क्षेत्रात विविध उपक्रम यशस्वी केले असून येत्या वर्षभरात किमान १०,००० युवक युवतींना रोजगार उपलब्ध करण्याचा संकल्प रेड स्वस्तिक व छत्रपती शिवाजी ब्रिगेडने जाहीर केला आहे. हा रोजगार मेळावा पूर्णपणे निःशुल्क असून या मेळाव्यासाठी अनेक नामवंत मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ जास्तीस्त जास्त युवक युवतींना घ्यावा असे आवाहन  राजेश झाल्टे,  रोशन मराठे, डॉ. धनंजय बेंद्रे, डॉ. गणेश पाटील, डॉ. एस. एस. पाटील, सतीश देशमुख, अशोक शिंदे आदींनी केले आहे.

Protected Content