रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा: डॉ. विनोद कोतकर

dr.

 

चाळीसगाव प्रतिनिधी । येथे आई फाऊंडेशन व शारदा नेत्रालय धुळे यांचे संयुक्त विद्यामाने खेडगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शिबीराचे उद्घाटन शिबीरात आलेल्या सर्वात वयोवृध्द रुग्ण पुंजाबाई महाजन, शालीकराव साळुंखे, बाळू शिरुडे, व जूम्मा पिंजारी यांचे हस्ते करण्यात आले. या शिबीराचा खेडी, खेडगाव ,बहाळ, दस्केबर्डी, आडळसे, रहीपुरी, जामदा, भवाळी या पंचक्रोशीतील 378 रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. त्यातील 46 रुग्णांची शारदा नेत्रालय येथे पूर्णतः मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अजूनही दुर्लक्षित राहिली असून, आई फाऊंडेशन यापुढे निश्चितच संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण जनतेसाठी तांड्यापाड्यापर्यंत अशा शिबीरांचे भविष्यात आयोजन करणार असल्याचे आई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.विनोद कोतकर यांनी सांगितले. त्यासाठीच खेडगांव येथून या आरोग्यदायी या मोहीमेचा शुभारंभ आज करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा असून शिबीरात आलेल्या प्रत्येक आजी आजोबांच्या रुपातच विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन होत असल्याचे सांगत ही आरोग्यसेवेची पालखी सर्वांच्या आशिर्वादाने आई फाऊंडेशन समर्थपणे पेलणार असल्याचे भावनिक प्रतिपादन डॉ.विनोद कोतकर यानी केले. यावेळी पंचक्रोशीतील डॉ. उल्हास शिरुडे, डॉ. उल्हास पाटील, डॉ. तुषार साळुंखे, यांचा आरोग्यदूत म्हणून सत्कार करण्यात आला.

शिबीराच्या यशस्वितेसाठी डॉ. चेतना कोतकर, सुधीर चव्हाण, संदीप पाखले, विवेक पुणेकर, सिमा मोरे, फातिमा शेख, रत्ना निकाळे यासह शारदा नेत्रालय येथील कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.

Protected Content