Home Cities मुक्ताईनगर आईच्या विजयासाठी क्रिशीकाने कसली कंबर : सांभाळली प्रचार फेरीची धुरा !

आईच्या विजयासाठी क्रिशीकाने कसली कंबर : सांभाळली प्रचार फेरीची धुरा !

0
44


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या विजयासाठी त्यांच्या कन्या क्रिशीका यांनी कंबर कसली असून त्या प्रचार फेर्‍यांचे नेतृत्व करत असल्याचे पाहून अनेकांनी कौतुक केले आहे. आज सालबर्डी येथील रॅलीमध्ये त्यांनी असेच लक्ष वेधून घेतले.

आरावेर लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे खासदार रक्षाताई खडसे यांनी झंझावाती प्रचार सुरू केला असून याला मोठा प्रतिसाद लाभत आहे. त्या स्वत: मैदानात उतरल्या असून कुटंबिय देखील त्यांच्या मदतीला आले आहेत. आधीच त्यांचे आई-वडील, भाऊ आदींसह आप्त प्रचारात सक्रीय झाले आहेत. यासोबत, त्यांचे पुत्र गुरूनाथ आणि कन्या क्रिशीका यांनी देखील पहिल्या दिवसापासून प्रचार सुरू केला आहे. पहिल्यांदा त्या आपल्या आईसोबत प्रचार करत होत्या. आता अंतिम टप्प्यात क्रिशीकाने स्वत: प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

आज सायंकाळी सालबर्डी गावातून भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. यात महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. यात लक्षणीय बाब म्हणजे क्रिशीकाने या प्रचार फेरीचे नेतृत्व केले. यामुळे सालबर्डीकरांनी क्रिशीकाचे मोठे कौतुक करत ठिकठिकाणी स्वागत केले. ही प्रचार फेरी तुषारभाऊ राणे यांच्यासह सहकार्‍यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहामध्ये पार पडली.


Protected Content

Play sound