शांतीगिरी महाराज यांनी सहा मतदारसंघातील भूमिका केली जाहीर

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले शांतिगिरी महाराज १० मे रोजी आज ६ लोकसभा मतदारसंघातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, दिंडोरी, शिर्डी, जळगाव आणि जालना या मतदारसंघात शांतीगिरी महाराज यांचा मोठा भक्त परिवार आहे.

पाप आणि पुण्य हे समजतं, कुणाचे नाव घेऊन सांगण्याची गरज नाही, एकाला मतदान करा, बाबांचा विचाराशी विचार जुळतात त्यांना मतदान करा. जय बाबाजी भक्त परिवार योग्य निर्णय घेईल, अशी भूमिका शांतीगिरी महाराजांनी स्पष्ट केली आहे. शांतीगिरी महाराज यांचा सामना नाशिक लोकसभा मतदारसंघात मविआचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासोबत होणार आहे. नाशिकमध्ये लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे.

 

Protected Content