Home Cities अमळनेर बंद घर फोडून ३० हजारांचे दागिने लांबविले

बंद घर फोडून ३० हजारांचे दागिने लांबविले


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील मुंदडा नगरात एका शेतकऱ्याचे बंद घर फोडून घरातून ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शनिवारी ४ मे रोजी सकाळी १० वाजता समोर आले आहे याप्रकरणी रविवारी ५ मे रोजी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक तुकाराम पाटील वय-५१, रा. मुंदडा नगर, अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. ३ मे रोजी रात्री १० वाजता ते कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप लावले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचे संधी साधत घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार दुसऱ्या दिवशी शनिवारी ४ मे रोजी सकाळी १० वाजता समोर आला. दरम्यान अशोक पाटील यांनी रविवार ५ मे रोजी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound