Home क्राईम गॅरेज दुकान फोडून १ लाख ४४ हजारांच्या बॅटऱ्या लांबविल्या

गॅरेज दुकान फोडून १ लाख ४४ हजारांच्या बॅटऱ्या लांबविल्या

0
46


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील नॅशनल गॅरेज दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ४४ हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्यांची चोरी केल्याची घटना मंगळवारी ३० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात शेख इमरान शेख गफ्फार हे आपले परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे नॅशनल गॅरेज नावाचे दुकान पाळधी गावात आहे .दरम्यान सोमवार २९ एप्रिल रात्री ९.३० वाजता ते नेहमीप्रकाणे दुचाकी बंद करून घरी निघून गेले. होते. अज्ञात चोरट्यांनी दुकान बंद असल्याचा फायदा घेवून मध्यरात्री बंद दुकान फोडून दुकानातून १ लाख ४४ हजार रुपये किमतीचे बॅटऱ्यांची चोरी केली. हा प्रकार मंगळवारी ३० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता समोर आला. याप्रकरणी शेख इमरान शेख गफ्फार यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ हे करीत आहे.


Protected Content

Play sound