जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील तरसोद गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरूणाच्या घरावर दगडफेक करून धारदार शस्त्राने वार करून हाताला दुखापत केल्याची घटना सोमवारी २२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २३ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता चार जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील तरसोद येथे विजय सुनिल अलकारी वय २५ हा तरूण कुटुंबासह वास्तव्याला आहे. विजय अलकारी याचे गावातील काही जणांसोबत वाद झाला होता. या वादाच्या कारणावरून सोमवारी २२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता विजय अलकारी याला गावात राहणारे योगेश अशोक राजपूत, धीरज रमेश राजपूत, गिरीश बापू राजपूत आणि राहून वामन राजपूत सर्व रा. तरसोद ता. जळगाव यांनी विजयच्या घरावर दगडफेक केली. तर धिरज राजपूत आणि गिरीश राजपूत यांनी धारदार शस्त्राने वार करून विजयच्या हातला दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर विजय अलकारी याने मंगळवारी २३ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणारे योगेश अशोक राजपूत, धीरज रमेश राजपूत, गिरीश बापू राजपूत आणि राहून वामन राजपूत सर्व रा. तरसोद ता. जळगाव यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव हे करीत आहे.