विटनेर येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील विटनेर येथे शेतकरी दुचाकीने मजूरांना पाणी घेवून जात असतांना मागून भरधाव येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील विटनेर येथील शेतकरी संतोष दशरथ पाटील (वय-४८) हे शेतकरी आहे. विटनेर शिवारात शेत असल्याने आज शेतात कापूस वेचण्यासाठी शेतमजूर रोजंदारीने लावले होते. सकाळी ८ वाजेच्या सुमारासमजूरांना शेतात पाणी नेण्यासाठी दुचाकी (एमएच १९ एझेड ४३७७) ने जात होते. त्याचवेळी मागून एरंडोलकडे भरधाव वेगाने जाणारी स्विप्ट डिझायर (एमएच १९ सीएच २३३३) कारने जोरदार धडक दिली. यात धडकेत दुचाकीस्वार शेतकरी संतोष पाटील हे ३० फुट फेकल्याने डोक्याला जबर मार बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कार उलटी झाली, कार चालकाने सिटबेल्ट लावले असल्याने एअरबँग उघडल्या यात चालक बचावला. दरम्यान घटनास्थळाहून कार चालक फरार झाला आहे. मयत संतोष पाटील यांचा मृतदेह जिल्हा शासकीय महाविद्यालयात आणण्यात आला असून शवविच्छेदनाचे काम सुरू होते.

Protected Content