रामेश्वर कॉलनी खून प्रकरण : सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाही; तपासात अडचणी

murder

जळगाव प्रतिनिधी । नवरा-बायकोच्या घरघुती वादातून झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्याची घटना रामेश्वर कॉलनीत संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेसमोर रात्री 10 वाजता घडली होती. दरम्यान शाळेच्या आवारात लावलेल्या सीसीटीव्ही बंद असल्याने कोणतही माहिती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे अगुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीसांच्या अडचणी वाढल्या आहेत.

रामेश्वर कॉलनी परीसरातील सप्तश्रृंगी कॉलनीत योगश प्रल्हाद चौधरी यांचे पाच पार्टेशनचे खोल्या आहेत. यातील तीन खोल्या भाड्याने दिलेल्या आहेत. या तीन पैकी एका खोलीत गणेश सखाराम भंडारे आपल्या पत्नीसह तीन मुलांसोबत राहत होता. गणेश हा सेंटींगचे काम करत असून त्याला दारूचे व्यसन होते. त्याचे कोणत्या ना कोणत्या कारणावरून दररोज भांडण होत होते. या भांडणात सतत पत्नी भारतीला मारहाण व शिवीगाळ करत होता. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी भारतीची आई अशा पौलाद पंचांगे आणि काका शंकर बाबूजीराव पंचांगे रा. मंगलधाम वडनेरा जि.अमरावती समजविण्यासाठी 22 जुलै रोजी गणेशच्या घरी आले होते.

भांडण सोडवितांना शस्त्राने छातीवर वार
भारतीला मारहाण करत असतांना भारतीने आराडाओरड करण्यास सुरूवात केली. यावेळी गल्लीतील अनेक लोक जमा झाले होते. त्याच सुमारास घराच्या बाजूला राहणारे योगेश ज्ञानेश्वर जंगले (वय- 37 रा. सप्तशृंगी कॉलनी, मूळ रा. साळवा-नांदेड, ता.धरणगाव) हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करत होते. या संतापलेल्या गणेशने घरातून धारदार शस्त्र योगेशच्या अंगावर येवून म्हणला की, “तुला आमच्या घरातल्या भांडणात यायचा काय संबंध आहे”, असे बोलून योगेश जंगलेच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केले. याचवेळी जखमी अवस्थेत योगेश घराकडे येत असतांना रस्त्यावरच पडले. योगेश जंगले याचा खून झाल्यानंतर गणेश पत्नी भारती आणि तीघे मुलांसह घरातून पळ काढला. मात्र थोड्या अंतरवर गेल्यानंतर गणेशने पत्नी भारती व मुलांना सोडून फरार झाला. गणेश हा मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील रहिवासी आहे.

दोन दिवसांपुर्वी सासुलाही केली होती मारहाण
मुलीला सतत दारूपिऊन मारहाण करीत असल्याने जवाई गणेश भंडारे याला समजविण्यासाठी आलेल्या सासु आशा पंचांगे यांना देखील गणेशने शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. हा वाद संपल्यानंतर पुन्हा 25 जुलै रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास गणेशने पुन्हा शिवीगाळ करून पुन्हा पत्नी भारतीला मारहाण करण्यास सुरूवात केली. भारतीला मारहाण करत घराबाहेर काढले होते.

सीसीटिव्ही फुटेज तपासले
रामेश्वर कॉलनीत सप्तश्रृंगी कॉलनीत ही घटना घडली. याच ठिकाणी संत ज्ञानेश्वर पाटील प्राथमिक विद्या मंदीर ही शाळा असून या शाळेत सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. ज्याठिकाणी ही घटना घडली त्याठिकाणची सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचे दिसून आले. यात कोणतीही माहिती उपलब्ध झाली नसल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांनी सांगितली. घटनेबाबत माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन व एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली हाेती. या घटनेबाबत चौकशी करण्यास सुरूवात करण्यात आली. मात्र पोलीसांना या घटनेची सविस्तर माहिती देण्यासाठी एकही नागरीक पुढे आला नाही. मयत योगेशची पत्नी दिपाली जंगले यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात आरोपी गणेश भंडारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहे.

Protected Content