यावल तहसील कार्यालयात खरीप पिक नियोजनाबाबत आढावा बैठक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तहसीलदार यावल यांच्या अध्यक्षतेखाली व शेतीतज्ञ यांच्या प्रमुख उपस्थित तालुका स्तरीय खरीप हंगाम २०२४ च्या पिकपेरणी नियोजना संदर्भातील मार्गदर्शन बाबतची आढावा बैठक घेण्यात आली.

यावल तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत तालुका कृषी अधिकारी भरत वारे, यावल,वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख महेश महाजन, मंडळ कृषी अधिकारी ,फैजपूर व किनगाव निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते, यावल, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिक्षक, यावल, कृषि अधिकारी पंचायत समिती, यावल पिक विमा तालुका प्रतिनिधी, कृषी सेवा केंद्र निविष्ठा विक्रेते संघटना, केळी उत्पादक निर्यात दार प्रगतशील शेतकरी, कृषि उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी, अग्रणी बँक प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्र प्रतिनिधी, सहायक निबंधक यावल तसेच कृषी विभाग व महसूल विभागातील क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी खरीप हंगाम२०२४ पूर्व तयारी नियोजना बाबत अध्यक्ष तहसीलदार यावल यांनी मागील वर्षाचे विविध योजनेतर्गत लक्ष व साध्या बाबत आढावा व मार्गदर्शन केले. खरीप हंगाम २०२४ चे नियोजन, अडचणी बाबत चर्चा करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी ,यावल यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांच्या मागील वर्षीचे लक्ष सध्य व चालू हंगामातील योजना निहाय नियोजन बाबत सादरीकरण करून मार्गदर्शन व चर्चा केली. कृषी विज्ञान केंद्र पाल येथिल वरिष्ठ शास्त्रज्ञ महेश महाजन यांनी १० टक्के रासायनिक खताचा वापर कमी करून माती परीक्षण नुसार सेंद्रिय, नैसर्गिक शेती नियोजन बाबत मार्गदर्शन केले. तसेच तालुक्यातील विविध प्रमुख पिकाचे उत्पादन वाढ तंत्र, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन बाबत नियोजन बाबत मार्गदर्शन केले.

Protected Content