Home क्राईम तरूणाचे बंद घर फोडून ४३ हजारांचा ऐवज लांबविला !

तरूणाचे बंद घर फोडून ४३ हजारांचा ऐवज लांबविला !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कुसुंबा शिवारातील फातेमा नगरात तरूणाच्या बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरातून ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच रोख २३ हजार रुपये असा एकूण ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना बुधवारी १७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमन अनिस पटेल (३०, रा. फातेमा नगर, कुसुंबा शिवार) हे आपल्या परिवारसह वास्तव्याला आहे. एका कंपनीमध्ये सेल्समन म्हणून नोकरीला आहे. मंगळवारी १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता ते घर बंद करून बाहेर गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून २० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, रोख २३ हजार रुपये असा एकूण ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. बुधवारी १७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता अमन पटेल हे घरी आले त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.


Protected Content

Play sound