जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे राहणाऱ्या एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना मध्यरात्री १ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी १८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द गावात ४५ वर्षीय महिला या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती मजुरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. बुधवार १७ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास महिला या घरात एकट्या असताना गावात राहणारा संशयित आरोपी जितेंद्र अशोक सोनवणे हा महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. तसेच महिलेच्या भावाला फोनवरून जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी ३ वाजता संशयित आरोपी जितेंद्र अशोक सोनवणे यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप राजपूत हे करीत आहे.




