Home Cities जामनेर फुले विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

फुले विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

0
97


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय मध्ये भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वडाळी गावचे विद्यमान सरपंच संजय भाऊ बनसोडे होते . वेदिका भामेरे , क्रीडा शिक्षक हरीभाऊ राऊत , भगवान जाधव यांनी मनोगतातून विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले . यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली घोंगडे , माधुरी बारी , आश्विनी पाटील , पल्लवी वानखेडे , चंदेश सागर , राजेंद्र सोनवणे , दिपक पाटील , अमोल बावस्कर , भाऊसाहेब प्रकाश जोशी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थितीत होते . सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामरे यांनी केले तर आभार कल्पना बनकर यांनी मानले . सुनिल पवार यांचे सहकार्य लाभले


Protected Content

Play sound