धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार बांधव यांना १३ एप्रिल रोजी आज पुरवठा निरीक्षक किशोर मोरे साहेब, रविंद्र म्हसकर साहेब यांच्या उपस्थितीत तालुक्याचे इंजिनीयर संदीप चव्हाण तसेच रोहित पोतदार यांच्या हस्ते नवीन पीओएस मशीन सर्व स्वस्त धान्य दुकानदार बांधव यांना देण्यात आले.
संघटनेच्या अनेक मागण्या पैकी एक मागणी पूर्ण झाल्याबद्दल अध्यक्ष श्री जी. डी.पाटील उपाध्यक्ष श्री प्रभाकर अण्णा पाटील तसेच सचिव श्री निलेश ओस्तवाल यांनी शासनाचे आभार मानले. प्रसंगी सर्व दुकानदार बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राजु भाऊ ओस्तवाल तसेच श्री अमोल पाटील यांनी प्रयत्न केले
धरणगाव येथे स्वत धान्य दुकानदारांना पीओएस मशीनचे वाटप
9 months ago
No Comments