मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना चिन्हे देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मोठया पक्षांचे तर त्यांचे स्वत:चे अधिकृत चिन्ह आहे. जसं अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते, तर शिवसेना फुटीनंतर उध्दव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले होते. परंतू आता काही नवीन चिन्हे नवउमेदवारांना मिळाले आहे.
महायुतीचे परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांन शिट्टी हा चिन्ह मिळाला आहे. बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिनेश बूब यांना दिली आहे. आयोगाने त्यांनाही शिट्टी हा चिन्ह दिला आहे. तर प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वंचित बहूजन आघाडीला प्रेशर कुकर हा चिन्ह देण्यात आला आहे.