महावितरणची थकबाकी एकरकमी भरणाऱ्या माजी सरपंचांचा सत्कार

बुलढाणा, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरण कंपनीच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील शेतकरी आणि हिंगणा काझी येथील माजी सरपंच हरिभाऊ फासे यांनी शेतीपंपाच्या देयकापोटी असलेली सुमारे चार लाख रूपयांची रक्कम एकरकमी भरून आदर्श निर्माण केला आहे.

 

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मधुकर हरिभाऊ फासे माजी सरपंच हिंगणा काजी यांच्या नावे आठ शेती पंपाच्या जोडण्या आहे. सर्व जोडण्याची एकत्रित थकबाकी ३ लाख ९६ हजार रुपये होती. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हरिभाऊ फासे यांच्याशी संपर्क साधला.त्यांना कृषी पंप विज धोरणाची माहिती देऊन योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले. महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी सरपंच फासे यांनी थकबाकी पोटी असलेली रक्कम एकरकमी भरली. त्याबद्दल उपकार्यकारी अभियंता, महावितरण, उपविभाग मलकापूर यांच्या तर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ मार्च २०२२ही अखेरची तारीख आहे. बुलढाणा जिल्ह्यातील १५४९ शेतकरी बांधवांनी ४ कोटी ८३ लाख रुपये भरून थकबाकी मुक्त झाले आहे.जिल्ह्यातील उर्वरित शेतकरी बांधवांनी देखील योजनेत सहभागी होण्याचे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.

Protected Content