जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील शिवशंकर कॉलनीत जुन्या वादातून तरूणाला शिवीगाळ व मारहाण करत बिअरची बाटली मारून दुखापत केल्याची घटना १ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चौकशी अंती अखेर शनिवारी ६ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात ७ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील शिवशंकर कॉलनीत दिपक दगडू भोई हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता दिपक भोई हा घरी असतांना जुन्या वादातून त्यांच परिसरात राहणारे स्वामी राजेंद्र पोतदार, सचिन राजेंद्र पोतदार, राजेंद्र पोतदार, संगिता राजेंद्र पोतदार, मनिषा सचिन पोतदार, कुमार निकम आणि सुरेश महाजन यांनी दिपक याला शिवीगाळ करून मारहाण केली तर एकाने बिअरची बाटली मारून दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर जखमीस शासकीय वैदृयकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी अखेर चौकशी अंती शनिवारी ६ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता शहर पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे स्वामी राजेंद्र पोतदार, सचिन राजेंद्र पोतदार, राजेंद्र पोतदार, संगिता राजेंद्र पोतदार, मनिषा सचिन पोतदार, कुमार निकम आणि महाजन सर्व रा. इंद्रप्रस्थ नगर यांच्या विरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील हे करीत आहे.