न्यायालयाच्या आवारात गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या पोलीस कोठडीत वाढ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा न्यायालयाच्या आवारात बुरखा घालून मुलाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी गोळीबार करण्याच्या प्रयत्न जळगाव शहर पोलिसांनी उधळून लावला होता. याप्रकरणी एकाला शहर पोलीसांनी अटक केली होती. संशयिताची पोलीस कोठडी संपल्यानंतर सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे.

मनोहर आत्माराम सुरडकर (वय-५०) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, मनोहर आत्माराम यांचा मुलगा धम्मप्रिय याचा दोन जणांनी जुन्या वादातून तिक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून केला होता. यात दोन जणांना अटक करण्यात आली होती. त्यांनी सोमवारी २० फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात सुनवाई होती. मुलाचा खूनाचा बदला घेण्यासाठी मनोहर सुरळकर हे सुरेश इंधाटे याला सोबत घेत सोमवारी २० फेब्रुवारी रोजी भुसावळ येथून जळगावात आले होते. यादरम्यान कुणालाही संशय येवून नये म्हणून दोघांनी मुस्लिम महिला बुरखा घालतात तो बुरखा घातला होता व जिल्हा न्यायालयात दत्त मंदिराच्या जवळ ते दोघेही दबा धरुन संशयितांच्या प्रतिक्षेत बसले होते. या मुस्लीम पेहरावातील दोघांना पाहून पोलिसांच्या एका खबर्‍याला संशय आला. त्याने याबाबतची माहिती शहर पोलिसांना माहिती दिली, त्यानुसार शहर पोलिसांच्या पथकाने मनोहर सुरळकर यास अटक केली होती, त्याच्याकडून ५ हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा व ५ जीवंत काडतूस जप्त करण्यात आले होते. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी २७ फेब्रुवारी दुपारी ३.३० वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती आर.वाय खंडारे यांनी संशयिताची १ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.

Protected Content