गावठी कट्टे व काडतुसांसह चौघांना अटक

Chopda चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सहा गावठी कट्टे आणि ३० जिवंत काडतुसे घेऊन जाणार्‍यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, सातारा जिल्ह्यातील चार तरूण गावठी कट्टे खरेदी करण्यासाठी आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने चोपडा ते शिरपूर रोडवरील एस्सार पेट्रोलपंपाजवळ गणेश उर्फ सनी सुनील शिंदे (वय २५ रा. ओगलेवाडी, ता. कराड, जि. सातारा), मोहसीन हनिफ मुजावर (३० रा. युवराज पाटील चौक, मसूर, ता. कराड जि. सातारा), रिजवान रज्जाक नदाफ (वय २३, रा. शिवाजी चौक, मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) व अक्षय दिलीप पाटील( वय २८, रा. रविवार पेठ, कराड, जि. सातारा) या चौघांना अटक करण्यात आली. ही कारवाई १७ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या चौघा युवकांकडून ६ गावठी कट्टे आणि ३० जिंवत काडतूसांसह मोबाईल फोन आणि चारचाकी असा एकूण ३७ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनात व पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वात हेड कॉन्स्टेबल दीपक विसावे, पोलिस नाईक संतोष पारधी, संदीप भोई, कॉन्स्टेबल शुभम पाटील, प्रमोद पवार, प्रकाश मथूरे यांच्या पथकाने केली.

Protected Content