दुसऱ्या मजल्यावरून पडलेली चिमुकली अत्यवस्थ; खंडेराव नगरातील घटना

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खंडेराव नगरात घरात चार वर्षीय चिमुकली पहिल्या मजल्यावर खेळत असतांना लोखंडी ग्रिलमधून खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. अत्यवस्थ अवस्थेत चिमुकलीला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

नातेवाईकांडून मिळालेली माहिती अशी की, हर्षल प्रकाश जोशी रा. एमएसईबी सबस्टेशन, खंडेराव नगर हे आपल्या पत्नी व मुलगी श्राव्या हर्षल जोशी (वय-४) सह वास्तव्याला आहेत. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास कुटुंबियाला लहान मुलांसोबत मुलगी श्राव्या घरातील पहिल्या मजल्यावर खेळ होते. वरच्या मजल्यावर असलेल्या घरात लहान मुले खेळत आहे याकडे घरातील सदस्यांचे दुर्लक्ष होते. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास श्राव्या ही जिन्याच्या लोखंडी ग्रिल मधून अचानकपणे खाली पडली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आईवडीलांनी तातडीने चिमुकलीला शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. चिमुकलीची प्रकृती अत्यंत गंभीर असून बेशुध्दावस्थेत आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसांना खबर देण्यात आली आहे.

Protected Content