नागपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. त्यांनी प्रहार पक्षाकडून अमरावतीमध्ये दिनेश बूब यांना भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात उभे केले आहे. आता त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्याम कुमार बर्वे यांना जाहीरपणे पाठिंबा दिला आहे.
महायुतीत घटक पक्ष असताना ही ते महायुतीच्या विरोधात भूमिका घेत आहे. भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज होते. महायुतीमध्ये बच्चू कडू यांचा सन्मान होत नाही असा पवित्रा प्रहार जनशक्ती पक्षाच्या कायकर्त्योनी घेतला आहे. रामटेकमधील बैठकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला. हा पाठिंबा फक्त रामटेकपुरताच आहे.