Home Cities जळगाव जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पारोळयात टंचाईच्या कामाचा घेतला आढावा

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पारोळयात टंचाईच्या कामाचा घेतला आढावा

0
100

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथे टँकर ग्रस्त गावाची पाहणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत ) अनिकेत पाटील यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. यावेळी गटविकास अधिकारी किशोरजी शिंदे यांच्याकडून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधील पाणी टंचाई व जनावराच्या चाऱ्या बाबतीत माहिती घेऊन संभाव्य परिस्थिती जाणून घेऊन त्याबाबत करावयाच्या उपाययोजना /कार्यवाही बाबतीत सूचना दिल्या.

जलजीवन योजनेच्या सुरु असलेल्या योजना त्वरित पूर्ण करण्याबरोबर मनरेगा अंतर्गत कामे करणे, शाळांना संरक्षण भिंतीचे कामे पूर्ण करण्याच्याही सूचना दिल्या. ग्रामसेविका, ग्रामस्थ तसेच डेप्युटी इंजिनियर धीरज पाटील,विस्तार अधिकारी सुनील पाटील. शाखा अभियंता संदीप सोनवणे यावेळी हजर होते.


Protected Content

Play sound