द केरळ स्टोरी चित्रपट पुन्हा वादात; दुरदर्शनवर प्रसारित न करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | द केरल स्टोरी हा चित्रपट शुक्रवारी ५ एप्रिल रोजी आज दूरदर्शन वाहिनीवर दाखवला जाणार आहे. हा चित्रपट ५ मे २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट दुरचित्रवाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. त्यावेळी चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी बरेच वाद-विवाद झाले होते. हिंदू मुलींना कशा पद्धतीने फसवून कट्टरपंथीय प्रदेशात नेले जाते, ते या चित्रपटात दाखवलं आहे.

हा चित्रपट धार्मिक तेढ निर्माण करत आहे, असे आरोप त्यावर लागले होते. या चित्रपटाने चांगली कमाई करून तो हिट ठरला होता. पण आता हा दुरदर्शन या वाहिनीवर प्रदर्शित होणार असल्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. यादरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी हा चित्रपट दूरदर्शनवर प्रदर्शित करण्यास विरोध केला आहे. लोकसभा निवडणूकीदरम्यान या चित्रपटामुळे सांप्रदायिक तेढ निर्माण होऊ शकतो अशी चिंता मुख्यमंत्री विजयन यांनी व्यक्त केली आहे. दूरदर्शनने भाजपा आणि आरएसएसची प्रचार यंत्रणा बनू नये असेही यावेळी केरळचे मुख्यमंत्री म्हणाले.

 

Protected Content