धुडकू सपकाळे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या हमाल संघटनेचे काम बंद आंदोलन

4PNE19P82221 2

जळगाव, प्रतिनिधी | फळे व भाजीपाला हमाल मापाडी जनरल कामगार संघटना अध्यक्ष धुडकू सपकाळे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ व आरोपीना तात्काळ अटक करून कठोर शासन करण्यासाठी कामगार संघटनेच्या वतीने फळे व भाजीपाला मार्केट जळगाव या ठिकाणी काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

संघटनेतर्फे आज रात्री पासून कुठलीही भाजीपाला व फळे मार्केटमध्ये गाडी खाली किंवा भरली जाणार नाही. याची नोंद सर्व व्यापारी , आडात दुकानदार ,ग्राहक ,व शेतकरी यांनी घ्यावी असे फळे व भाजीपाला हमाल मापाडी जनरल कामगार संघटनेच्या वतीने रमेश बिऱ्हाडे, संजय बोरसे, नितीन पाटील, शेख इस्माईल शेख हारून बागवान आदींनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content