Home राजकीय सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण

सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण

0
44

सोलापूर प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यात काळे झेंड दाखविणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलीसांनी अमानुष मारहाण केल्याचा प्रकार आज घडला.

सोलापुरात इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेपूर्वी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेधाच्या घोषणा देणार्‍या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. नरेंद्र मोदी सभास्थळी जात असताना त्यांच्या ताफ्यापासून काही अंतरावर असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले तसेच मचौकीदार चौर हैंफ अशा घोषणा दिल्या. तेव्हा पोलिसांना या कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर एनएसयूआयचा जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, निवृत्ती गव्हाणे, शुभम माने, शिवराज बिराजदार आणि सिद्धराम सगरे या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. पोलीस प्रशासनाच्या या दडपशाहीचा काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. तर मोदींच्याच दौर्‍यात आंदोलनाचा प्रयत्न करणार्‍या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound