माथेफिरू संतोष मानेची फाशी रद्द

मुंबई प्रतिनिधी । बसखाली नऊ जणांचा चिरडून ठार मारणार्‍या माथेफिरू संतोष मानेची फाशीची शिक्षा रद्द करून याला सुप्रीम कोर्टाने आज जन्मठेपेत परिवर्तीत केले आहे.

याबाबतची माहिती अशी की, संतोष माने हा स्वारगेट डेपोत नियुक्तीवर होता. २५ जानेवारी २०१२ रोजी त्याने स्वारगेट डेपोतील एसटी बस बेफामपणे चालवून त्यानं ९ जणांना चिरडलं होते. याशिवाय यात ३७ जण जखमी झाले होते. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. त्याला लागलीच अटक करून खटला चालविण्यात आला होता. ८ एप्रिल २०१३ रोजी संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र त्यानंतर हाय कोर्टाने मानेला दिलासा देताना, फाशीची शिक्षा रद्द केली होती.

त्यानंतर आपल्याकडून हे कृत्य वेडाच्या भरात घडले होते त्यामुळे भादंवि कलम ८४ अन्वये हे गुन्हे माफ करावेत, असा बचाव माने याने आधी पुण्याच्या सत्र न्यायालयात व नंतर मुंबई उच्च न्यायालयात केला होता. माने याने वेडाच्या भरात हे कृत्य केल्याचा बचाव सर्वप्रथम केला. त्यानंतर मानसोपचार तज्ज्ञांकडून दोन अहवाल दिले गेले. ते पाहून सत्र न्यायालयाने मानेचा वेडाचा बचाव अमान्य केला. उच्च न्यायालयानेही तेच मत नोंदविले होते आणि नऊ खुनांबद्दल फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर मानेने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. येथे त्याला दिलासा मिळाला असून त्याची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आलेली आहे. या शिक्षेला आता जन्मठेपेत परिवर्तीत करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content