यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल-चोपडा मार्गावरील वढोदे गावाजवळच्या रस्त्यावर रिक्षा आणि दुचाकीचा झालेल्या भीषण अपघातात रिक्षातील दाम्पत्य आणि दुचाकीवरी दाम्पत्य हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, कैलास विक्रम पाटील वय-५२ वर्ष व त्यांच्या पत्नी आशा वर्कर वंदना कैलास पाटील वय-४८ वर्ष रा. गिरडगाव ता. यावल हे यावल येथून आपले शासकीय कामकाज आटोपुन आपल्या घरी येणासाठी दुचाकी (एमएच १९ बीसी २१००) या दुचाकी वाहनाने यावलहुन गिरडगावला येण्यासाठी निघाले. त्यावेळी वढोदे गावाजवळ समोरून येणारी रिक्षा (एमएच १९ सि डब्ल्यु५१२१)ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कैलास पाटील व त्यांच्या पत्नी वंदना पाटील यांना गंभीर दुखापत झाले. तर रिक्षातील दाम्पत्य देखील जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच याव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नरेन्द्र बागुले व त्यांच्या सहकार्यानी धाव घेत तात्काळ जख्मी यावलच्या ग्रामीण रूग्णालयात प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव पाठविण्यात आले. यावल पोलीसांनी अपघातातील दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात जमा केली आहे.