
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील साकळी गावातुन अज्ञात चोरटयांनी एका शेतकऱ्याच्या खळयातुन बैलजोडी चोरून नेल्याची घटनासमोर आली असुन, याबाबत शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी दिनेश किसन लोधी (वय ३०) वर्ष शेतकरी यावल तालूक्यात साकळी या गावात आपल्या कुटुंबासमवेत राहतात.

२८ मार्च गुरूवार रोजी रात्रीच्या सुमारास साकळी गावाला लागुन असलेल्या दिनेश लोधी यांच्या खळयातुन गुराच्या दावनीला बांधलेले सुमारे ५० हजार रुपये किमतीची निमाडी जातीची महागडी बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळीस कुलुप तोडून सदरची बैलजोडी चोरून नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान फिर्यादी हे नेहमी प्रमाणे सकाळी आपल्या खळयात गेले असता हा प्रकार निर्दशनास आला. सदर या शेतकरी कुटुंबाने परिसरात बैलजोडीचा शोध घेतला असता ते मिळुन आले नाही. या घटनेमुळे शेतकरी कुटूंब हवालदिल झाले आहे. याबाबत साकळी येथील शेतकरी दिनेश किसन लोधी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून यावलच्या पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हॅड कॉस्टेबल पोलीस हे करीत आहे



