बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागावाटप निश्चित

पटना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी लोकसभा निवडणूकीसाठी इंडिया आघाडीच्या बिहारमध्ये जागावाटपाची निश्चिती झाली आहे. या लोकसभा निवडणूकीला लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल या पक्षाला २६, काँग्रेस पक्षाला ९ आणि डावे पक्षांना ५ जागा देण्यात आल्या आहे. डावे पक्षात सीपीआयमाले लिबरेशनला ३ आणि सीपीआय-सीपीएमला प्रत्येकी १-१ जागा देण्यात आली आहे.

बिहारची राजधानी पटना येथील राष्ट्रीय जनता दल यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत हे जागावाटप जाहीर करण्यात आले. बिहारमध्ये ४० लोकसभेसाठी मतदारसंघ आहे. बिहारमध्ये काँग्रेसच्या इंडिया आघाडीचा सामना थेट भाजपप्रणीत एनडीएशी होणार आहे. एनडीएमध्ये भाजप व्यतिरिक्त जेडीयू, हम, एलजेपी रामविलास पासवान, आरएलएम हे पक्ष आहे. एनडीएचे बिहारमध्ये जागावाटप आधीच निश्चित झाले आहे.

 

Protected Content